बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने भाऊ आई वडिलांना देत होता त्रास शेवटी जावायाने काढला काटा

अंजनगाव बारी : अंजनगाव बारीजवळील पारडी जंगलात २३ एप्रिल रोजी झालेल्या एका अमानुष खुनाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रोशन महिंद्रसिंग नाईक (वय ३५) या तरुणाचा खून त्याच्या जावयाने व मित्रासोबत मिळून केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
घटनेचा तपशील:
२३ एप्रिल रोजी पारडी जंगलात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, मात्र मृतकाची ओळख पटवण्यात अपयश येत होते. रात्री उशिरा मृतकाची ओळख पटली आणि तपासात खळबळजनक माहिती समोर आली.
खुनामागील कारण:
मृतक रोशन नाईक याच्या बहिणीने आंतरजातीय विवाह केला होता. हा विवाह रोशनला मान्य नव्हता. त्यामुळे तो सतत दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत होता. या वादामुळे संतप्त झालेल्या जावई रवी गंगाधर वानखडे (वय ३५) याने आपल्या मित्र दिनेश बंडू कुऱ्हाडकर (वय २६) याच्यासोबत मिळून रोशनचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला.
खुनी प्लॅनची अंमलबजावणी:
दोघांनी रोशनला पारडी जंगलात नेले, त्याला दारू पाजली आणि मानेवर चाकूने वार करत निर्दयपणे ठार मारले. त्यानंतर हे दोघे घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांची जलद कारवाई:
सीपी स्कॉडने तत्काळ कारवाई करत रात्रीच दोघांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने सीपी स्कॉड प्रभारी PI आसाराम चोरमले व PI सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.