विद्यापीठाच्यावतीने आयोजित 2023-24 वार्षिकांक स्पर्धेतील पारितोषिकांची घोषणा

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाद्वारे प्रकाशित वार्षिकांकामधून उत्कृष्ट वार्षिकांक ला पारितोषिक देण्यासाठी स्पर्धा घेतल्या जाते. 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रकाशित वार्षिकांक स्पर्धेतील पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. शहरी विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गट आणि ग्रामीण विभागांतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक गटात सदर स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत शहरी विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या ‘भारती’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या ‘क्रिएशन’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळच्या ‘शब्दार्क’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे.
ग्रामीण विभागांतर्गत बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक इंदिरा महाविद्यालय, कळंबच्या ‘कदंबिनी’ या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजारच्या ‘फुलोर’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसदच्या ‘कल्पना’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे.
शहरी व ग्रामीण विभागांतर्गत व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या क्रेस्केन्डो या वार्षिकांकास, द्वितीय क्रमांक प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराच्या ‘मित्रा व्हायब्रोशन्स’ या वार्षिकांकास व तृतीय क्रमांक सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या ‘इन्नोव्हेटर’ या वार्षिकांकास घोषित करण्यात आला आहे. प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
संबंधित पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दि. 1 मे, 2025 रोजी सकाळी ध्वजारोहणानंतर विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहामध्ये आयोजित सत्कार समारंभाला उपस्थित राहावयाचे आहे. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावयाची असून पारितोषिके प्राप्त महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्याठिकाणी कार्यरत सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्याथ्र्यांचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.