डॉ. प्रिती टवलारे यांना विद्यापीठाचा ‘कल्पना चावला युवा महिला संशोधन पुरस्कार’ जाहीर

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाव्दारे दिला जाणारा ‘कल्पना चावला युवा महिला संशोधन पुरस्कार – 2024’ अचलपूर शहरातील जगदंब महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रिती किशोर टवलारे यांना घोषित झाला आहे. दि. 1 मे, 2025 रोजी विद्यापीठात आयोजित सत्कार समारंभामध्ये सन्मानपूर्वक त्यांना हा पुरस्कार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे.
डॉ. टवलारे जवळपास पाच वर्षांपासून शिक्षक पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र विषयामध्ये पी.जी. केले होते. त्यामध्ये त्या तिस-या मेरीट होत्या. त्यांचे पंचवीस संशोधन पेपर नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या संशोधनाला 3 पेटेंट प्राप्त झाले असून आर.जी.एस.टी.सी. कडून 2.50 लक्ष आणि डी.एस.टी. कडून 18.30 लक्ष रुपयांचे दोन संशोधन प्रकल्प त्यांना मिळाले आहेत. बेस्ट पेपर अवॉर्डने त्यांना दोनदा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या खाती रेव्ह्रू ऑफ जर्नल 6 असून एका पुस्तकाचे त्यांनी संपादन केले आहे. तीन पुस्तकामध्ये त्यांचे चॅप्टर प्रकाशित झाले आहेत. 21 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. उत्कृष्ट संशोधक डॉ. प्रिती किशोर टवलारे यांना विद्यापीठाचा ‘कल्पना चावला युवा महिला संशोधन पुरस्कार – 2024’ ने महाराष्ट्र दिनी होणा-या सत्कार समारंभामध्ये गौरवान्वित केले जाणार आहे.
पुरस्काराबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, ननसा संचालक डॉ. अजय लाड यांनी डॉ. प्रिती टवलारे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.