Accident NewsAmravatiLatest News
नागपूर महामार्गावर कार-ट्रकची समोरासमोर धडक; पुलावरच अडल्याने मोठी दुर्घटना टळली
अमरावती : २६ एप्रिलच्या दुपारी नागपूर महामार्गावरील बिझीलँड जवळ भीषण अपघात घडला. जोरदार वेगात असलेल्या डीजे ७०७७ क्रमांकाच्या ट्रक आणि एमएच २७ डीएल ०२६१ क्रमांकाच्या क्रेटा कार यांच्यात समोरासमोर धडक झाली.
अपघातात दोन्ही वाहनांचे समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कारमध्ये पाच प्रवासी होते, सुदैवाने ट्रक आणि कार पुलाच्या कठड्यावर अडकल्याने २० फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचले आणि एक भीषण दुर्घटना टळली.
अपघात घडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. कारचालकाच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात कलम २८१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.