LIVE STREAM

Latest NewsYavatmal

यवतमाळ जिल्ह्यात 35 शेतकऱ्यांची मका लागवडीतील फसवणूक

यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हैदराबाद येथील आयुषी ऍग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून 35 शेतकऱ्यांनी एकत्रितपणे 120 एकर क्षेत्रावर मका लागवड केली होती. मात्र, या लागवडीला अपेक्षित यश मिळाले नाही. बहुतांश शेतांमध्ये मका कणसालाच आला नाही आणि जे कणीस आले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे निघाले.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयुषी ऍग्रोटेक कंपनीने बियाणे स्वखर्चाने घेऊन चांगल्या उत्पादनाचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात उत्पन्न ठरताच शून्य झाले. प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी एक लाखांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.

आघाडीच्या शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीने फोन उचलणे थांबवले आणि कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

शेतकऱ्यांनी आता कृषी विभाग तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे लेखी तक्रारीसह दाद मागितली आहे. त्यांची मागणी आहे की,

  • कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत,
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी,
  • आणि संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या घटनेने संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!