अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त गंगा सावित्री निवासस्थानी जल्लोष

अमरावती : रविवारी रात्री बारा वाजता आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थान समोर त्यांच्या वाढदिवसाचा उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमदार रवी राणा यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते.
कार्यक्रमात भल्या मोठ्या केकचा समारंभपूर्वक कापून आनंद साजरा करण्यात आला. आमदार रवी राणा यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना केक वाटून मोठ्यांचे आशीर्वाद घेतले.
युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात नारेबाजी केली आणि महापुरुषांच्या नावांचा जयघोष करत वातावरणात जोश निर्माण केला. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
वाढदिवसाचा कार्यक्रम केवळ वैयक्तिक नव्हता, तर जनसेवेच्या व्रतासोबत साजरा करण्यात आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सर्व धर्मातील नागरिकांनी पुष्पगुच्छ अर्पण करून आमदार रवी राणा यांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, तसेच अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले.