AmravatiLatest News
माता, नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन

अमरावती : नवजीवन हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या वर्षा दिपक कुटेमाटे ही गर्भवती महिला आणि नवजात बाळकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे.
या चौकशी समितीमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ – अध्यक्ष, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे – सहअध्यक्ष, तर सदस्य स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा शेंद्रे, भिषक डॉ. प्रीती मोरे यांचा समावेश आहे. या समितीला प्रकरणाचा वस्तुनिष्ठ आणि विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहे.