दर्यापुरातील वर्षा कुटेमाटे मृत्यू प्रकरण: नवजीवन हॉस्पिटलवर चौकशीचे आदेश

दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील कळाशी गावातील वर्षा दीपक कुटेमाटे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी अमरावतीच्या नवजीवन हॉस्पिटलवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आज अमरावती वैद्यकीय चिकित्सालयाची टीम थेट नवजीवन हॉस्पिटलवर धडक दिली आणि चौकशी प्रक्रिया सुरू केली.
डॉ. रवींद्र साबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर वर्षा कुटेमाटे यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पीडित कुटुंब आणि परिसरातील नागरिकांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करत चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर आज हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय परवाने, सर्टिफिकेट्स आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. हॉस्पिटल कर्मचारी सर्टिफिकेट्स साफ करताना आणि धुळीतून काढताना दिसले.
चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी कुटेमाटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी वर्षा कुटेमाटे यांच्या नातेवाइकांनी अश्रूंमधून डॉक्टरांविरोधात न्याय मिळवण्याची मागणी केली. त्यांनी हात जोडून सांगितले की, “आमच्यावर जी वेळ आली, ती दुसऱ्यावर येऊ नये. कृपया या डॉक्टरांवर कठोर कारवाई करा.