AkolaLatest News
“सातबारा कोरा” केवळ घोषणा? मृत शेतकऱ्यांच्या मातीसह नागपूरला निघालेल्या शेतकऱ्यांना अडवलं

मुर्तिजापर : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा क्षेत्रातील प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असं जाहीर आश्वासन दिलं होतं. मात्र, हे आश्वासन केवळ घोषणाच ठरल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या गावातील शिवारातील माती गोळा करून संबंधित शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासाकडे निघाले होते.
मात्र, मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आलं. हे आंदोलन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात होतं. त्यांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.