पुरोगामी महाराष्ट्रात ‘बसपा’च बहुजनांचे राजकीय प्रतिनिधित्व-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात केवळ बहुजन समाज पक्षच बहुजनांचे राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व करतेय.बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचे महामानवांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बसप वचनबद्ध आहे,असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.
बहुजन समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्हा कार्यकारणी च्या वतीने वडगाशेरी आणि पिंपरी येथे युगनायक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘युगनायक जयंती महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवात राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल दादा आण्विकर यांच्या भीमगीतांच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, मा.रामचंद्र जाधव, मा.ऍड.संजीव सदाफुले, मा.अप्पा साहेब लोकरे,मा.रविंद्र चांदने (बामसेफ संयोजक, पश्चिम महाराष्ट्र),
मा.अशोक रामटेके (सहसंयोजक),मा.अशोक दादा गायकवाड (अध्यक्ष, पुणे जिल्हा)
मा.प्रविण वाकोडे (महासचिव, पुणे जिल्हा),
मा.सागर जगताप (जिल्हा प्रभारी),मा.धम्मदिप लगाडे (जिल्हा प्रभारी),मा.बन्शि रोकडे (जिल्हा प्रभारी),मा.अनिल त्रिपाठी (जिल्हा प्रभारी),मा.परशूराम आरूणे (जिल्हा प्रभारी),
मा.महेश जगताप (जिल्हा प्रभारी),मा.राम डावखर (जिल्हा प्रभारी), सागर जगताप, मनोज कसबे, शिवाजी वाघमारे, सुबोध कांबळे, पी.आर.गायकवाड, संतोष सोनावणे, किशोर अडागले, प्रभाकर खरात यांच्या सह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अथांग भीमसागर महोत्सवात उपस्थित होता.
उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.चलवादी म्हणाले,प्रस्थापित राजकीय पक्षांनी शोषित, पीडित, उपेक्षित, वंचितांना राजकीय, सामाजिक,आर्थिक संसाधनांपासून सदैव वंचित ठेवले. तळागाळातील समाजाचा विकास करत त्यांना विकासाच्या ‘भीम प्रवाहात’ आणण्याचे कार्य बसपा अविरतपणे करीत आहे. पक्षाला आणखी बळकट करीत शोषितांना आवाज देण्याचे काम समाजाने करावे, असे आवाहन या निमित्ताने डॉ.चलवादी यांनी केले.
संविधान वाचवण्याचे मोठे आव्हान बहुजन समाजसमोर उभे आहे. संविधानामुळेच ताठ माने ने समाजात वावरण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे ई व्ही एम हटवून संविधानावर होणारे छुपे हल्ले रोखण्याची वेळ आली आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
स्थानिक पातळी वरून हॆ कार्य करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे सह सर्व महानगर पालिकेतील सत्तेच्या चाव्या बसपा च्या हाती देण्याचे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा जपून ठेवण्याची सामाजिक जवाबदारी प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक आहे.बसपचा प्रत्येक कॅडर या कार्यात अग्रेसर आहे. या सामाजिक चळवळीला त्यामुळे पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.