मनपात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्र्वर जयंती साजरी

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्र्वर यांच्या जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्र्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी स्वास्थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, प्रमोद मोहोड, भूषण खडेकार, शिवा फुटाणे, राकेश पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दोन्ही महामानवांच्या विचारांची आठवण करून देत, समाजातील एकोपा, समता आणि सेवा भाव यावर भर देण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.