अमरावतीत अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 10व्या शाखेचे भव्य उद्घाटन
अमरावती : अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 10व्या सुसज्ज शाखेचे उद्घाटन अमरावतीतील कॅम्प मार्गावरील IMA हॉलजवळ एका भव्य समारंभात पार पडले. उद्घाटन खासदार बळवंत वानखेडे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख आणि संतोष महाराज यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले.
उद्घाटनानंतर दीपप्रज्वलन करून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष ऍड. विजय बोथरा, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र बरडिया, संचालक सुदर्शन गांग, कवरीलाल सिंघई, राजेंद्र भन्साली, अॅड. गौरव लूनावत, नवीन चोरडिया आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शसिटी न्यूज अमरावतीचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतीया, समाजसेवक गोविंद कासट, तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी अभिनंदन बँकेच्या संचालक मंडळाला व पदाधिकाऱ्यांना नव्या शाखेसाठी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अध्यक्ष ऍड. विजय बोथरा यांनी सांगितले, “नवीन सुसज्ज शाखेमुळे नागरिकांना अधिक सोयीच्या व जलद सेवा मिळतील. बँकेचा उद्देश नेहमीच पारदर्शकता, विश्वास आणि ग्राहक केंद्रित सेवा देण्याचा राहिला आहे.”
अमरावतीत उभारलेली ही शाखा आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.