विद्यापीठाचे ‘वरातीमागून घोडे ‘दामटण्याचा प्रकार – डॉ. प्रशांत विघे
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाप्रमाणे महाविद्यालयाला दि. २२ एप्रिल २०२५ पासून उन्हाळी अवकाश देण्यात आला असताना आता दि. २८ एप्रिल २०२५ रोजी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तासिका भरून काढण्यासंदर्भातील पत्र निर्गमित केले आहे. हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा सोईस्कर प्रकार असल्याचे नुटा संघटनेचे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभासदस्य डॉ.प्रशांत विघे यांनी व्यक्त केला आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या तासिका पूर्ण करण्यासंदर्भात पत्र काढून विद्यापीठ महाविद्यालयावर भार टाकून स्वतः नामा निराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी असाधारण अधिसूचना क्रमांक ४८ निर्गमित केली आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच ही अधिसूचना निर्गमित करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता विद्यापीठाने परीक्षा सुरू १९ एप्रिल २०२५ पासून सुरु झाल्यानंतर ही अधिसूचना निर्गमित करणे म्हणजे आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रकार होय.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करून त्याचे प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असते, हा संपूर्ण भाग प्राचार्यांच्या अत्यारीत येत असला तरी विद्यापीठाने त्यावर अंकुश ठेवून तासिकांची नियोजन आणि सत्र परीक्षांचे नियोजन करणे गरजेचे असते,तशी कार्य महाविद्यालय करते. २८ एप्रिल २०२५ रोजीची अशा अधिसूचना काढून प्राध्यापक आणि प्राचार्यांना संभ्रमात टाकते. मुळातच विद्यापीठाचे दरवर्षी सत्र लागण्यापूर्वी वार्षिक नियोजन होत असतात, तर मग असे पत्र काढतात कशासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे.
प्राध्यापक वर्गाची विनती आहे, कि २८ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचना रद्द करावी अशा मागणीचे निवेदन कुलसचिव डॉ. अविनाश असणारे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे आणि डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी निवेदन सादर केले."पुढील सत्रापासून विद्यापीठाने शैक्षणिक वेळापत्रकाची व्यवस्थित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी केली.