AkolaLatest News
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची अकोल्यात कलश यात्रेत उपस्थिती, प्रदूषण रोखण्यासाठी कडक नियमांची घोषणा

अकोला : राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या निमित्ताने त्यांनी अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली.
यावेळी किल्ल्यांची माती आणि पवित्र नद्यांची माती त्यांनी जलकलशात विसर्जित केली, जे राज्यातील सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक मानले जात आहे.
माध्यमांशी बोलताना इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, उद्योगांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी हे पर्यावरणासाठी घातक ठरत असून, लवकरच कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाची पाऊले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.