Amaravti GraminLatest News
वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

भातकुली : भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर झेंडावंदन करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच मोहम्मद रिजवान, ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य, ग्राम महसूल अधिकारी संजय पवार, कोतवाल अभिजीत मकेश्वर, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश कंटाळे, संतोष इगोले, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच गावातील प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या सहभागातून महाराष्ट्र दिन साजरा करताना एकात्मता, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले.