LIVE STREAM

AmravatiLatest News

एसआरपीएफ अमरावतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सूर्यनमस्कारात महिलांचा भरघोस सहभाग, वर्ल्ड रेकॉर्डचा मान

अमरावती : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९, अमरावती येथे आजचा दिवस उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमात झेंडावंदन, राष्ट्रगीत, मान्यवरांचे भाषण व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात पोलीस महासंचालक पदक विजेते सहायक पोलीस उपनिरीक्षक फिरोज अताऊल्लाह खान यांचा प्रशासनाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर, मार्शल आर्ट क्षेत्रात अमरावतीचे नाव उज्ज्वल करणारे सेवानिवृत्त सहा. पो. उपनिरीक्षक बिधान बी. बिश्वास यांना देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

महिलांच्या सूर्यनमस्कार यशामुळे अमरावतीचा जागतिक स्तरावर डंका
महाराष्ट्र दिनी कार्यक्रमातील सर्वात मोठे आकर्षण ठरले ते SRPF योग वर्गातील महिलांचा राष्ट्रीय स्तरावरील सूर्यनमस्कार स्पर्धेतील सहभाग. ABYM अखिल भारतीय महासंघ आयोजित “७ वी ऑल इंडिया सूर्यनमस्कार चॅम्पियनशिप” मध्ये सहभाग घेत या महिलांनी सुवर्ण पदके आणि वर्ल्ड रेकॉर्ड पटकावले.

  • या यशस्वी महिलांमध्ये पुढील जणींचा समावेश होता:
  • सौ. मंदा सपकाळ – ५०० सूर्यनमस्कार क्लब अवॉर्ड
  • सौ. सारिका बावणे – ५०० सूर्यनमस्कार क्लब व वज्रासन मास वर्ल्ड रेकॉर्ड
  • सौ. आरती पाटील – ५०० सूर्यनमस्कार क्लब व सूर्यपुत्री पुरस्कार
  • सौ. पूजा मेश्राम, पल्लवी वानखडे, रंजना युवनाथे, शालिनी बेठे – प्रत्येकी १५० सूर्यनमस्कार
  • सौ. दीपाली जाधव, शीतल धारपवार, पूनम सोळंके – वज्रासन मास वर्ल्ड रेकॉर्ड विजेत्या

या सर्व यशस्वी महिलांच्या यशामागे योग प्रशिक्षक श्री. विकास मदने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी स्वतःही ५०० सूर्यनमस्कार व वज्रासन मास वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभाग घेत विक्रम नोंदवला.

पोलीस कल्याणासाठी सुरु केले योगा क्लासेस
या कार्यक्रमात मा. श्री एम. राकेश कलासागर (भा.पो.से.), समादेशक, मा. श्री सुरेश डी. कराळे, समादेशक सहाय्यक, व पोलिस निरीक्षक/कल्याण अधिकारी अजय काळसर्पे यांच्या पुढाकारातून पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी योगा क्लासेस सुरु करण्यात आले आहेत.

कार्यक्रमात सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मुख्यालय व पोलिस कल्याण कार्यालयाने केले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!