LIVE STREAM

Latest NewsNagpur

सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध

नागपूर : काल रात्री नऊच्या सुमारास नागपूरच्या नंदनवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. दोन चिमुकल्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. मोठी मुलगी १२ वर्षांची, तर धाकटी अवघी ४ वर्षांची. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबाची काळजी वाढली.

मात्र नशिबाने, नागपूर पोलिसांच्या तत्परतेने आणि नागरिकांच्या सहकार्याने काही तासांतच त्या दोघी सुखरूप सापडल्या आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.

कसे उलगडले संपूर्ण प्रकरण?
नऊ-साडेनऊच्या दरम्यान नंदनवन पोलिसांना दोघी मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. तत्काळ जयवंत चौहान यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू झाली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल आणि झोन ४ च्या डीसीपी रश्मिता राव यांच्या आदेशावरून संपूर्ण झोनमध्ये शोध मोहिमेला वेग आला.

सर्च ऑपरेशनमध्ये नंदनवन पोलीस स्टेशन, गणेशपेठ पोलीस, क्राईम ब्रँच आणि मार्शल पथक यांनी सहभाग घेतला.

रेल्वे स्टेशनवर मिळाल्या दोघी बहिणी
काही वेळातच एक कॉल आला — रेल्वे स्टेशन परिसरात दोन लहान मुली फिरताना दिसल्या. लगेचच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं. आणि तेथून दोघी चिमुरड्या सुखरूप सापडल्या.

बळजबरी किंवा अनुचित प्रकार झाल्याचे कोणतेही संकेत नव्हते. तपासानुसार, मोठी मुलगी मानसिक दबावाखाली होती. तिचा निकाल लागणार असल्याने ती चिंतेत होती आणि धाकट्या बहिणीला घेऊन ती घराबाहेर पडली.

शोध मोहिमेमध्ये कोणाचा होता मोलाचा सहभाग?
या मोहिमेत क्राईम ब्रँचचे राहुल माकणीकर, पाटील साहेब, निखिल कदम, राहुल शिरे, मुकुंद ठाकरे आणि कमलाकर गजीमे यांचे विशेष योगदान होते. रेल्वे स्टेशन परिसरात RCB चे ४० जवान सज्ज होते.

पालक आणि समाजासाठी धडा
दोघीही मुली सुखरूप सापडल्यामुळे हा प्रसंग सुखांत ठरला. मात्र या घटनेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो — “मुलांशी संवाद ठेवा.”

पोलीस आणि नागपूरकर नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि एकत्रितपणा खरंच कौतुकास्पद आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!