नागपूर पोलिसांनि अवैध धंद्यावर राबविली कडक मोहीम

नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नागपूर पोलिस दल अॅक्शन मोडवर असून, त्यांचा तपास आणि कारवाईला वेग आला आहे. काल रात्री डीबी पथकाने केलेल्या विशेष ऑपरेशनमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
डीबी पथकाचा विशेष ऑपरेशन
नागपूर शहरातील अवैध धंदे, गुटखा, ड्रग्ज आणि इतर गैरकायद्याचे व्यवसाय मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी आदेश दिले आहेत. यानुसार सन्माननीय जॉइंट सीपी श्री तांबोळी सर, अॅडिशनल सीपी श्री प्रमोद शुवाय सर, डीसीपी श्री मदने सर, डीसीपी सातव सर, एसीपी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
काल रात्री डीबी पथक पेट्रोलिंग करत असताना काही संशयास्पद व्यक्ती उशिरापर्यंत रस्त्यांवर थांबलेले दिसले. त्यानंतर पीएसआय देशमुख यांनी चौकशी केली आणि यामध्ये आयुष सम्राट मेश्राम (वय 20), जो मानकापूर परिसरात राहतो आणि अंमली पदार्थ विक्रीत गुंतलेला होता, त्याला ताब्यात घेतले.
तीन आरोपींना अटक
या कारवाईत आणखी एक संशयित व्यक्ती, जो कमली बाजारात पदार्थ खरेदी करत होता, त्यालाही अटक करण्यात आली. एनडीपीएस कायद्यानुसार यावर गंभीर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत सुभीर देगावकर आणि अमर पुरा यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोलाचे सहकार्य केले आहे.
पोलिसांचा संदेश
नागपूर पोलीस शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत आणि नागरिकांच्या सहकार्याने या गुन्ह्यांना पूर्णपणे प्रतिबंध करण्याचा निर्धार केला आहे. “पोलीस आणि जनतेने एकत्र येऊन या सामाजिक रोगांवर मात करण्याची वेळ आली आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले.