६ मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचा भव्य विभागीय मेळावा, पत्रकार परिषदेत दिली माहिती

अमरावती : प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने ६ मे रोजी भव्य विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात विभागातील तब्बल १८ हजार कार्यकर्त्यांचा संताजी-धनाजी पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
हा मेळावा कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा व दिशा निर्माण करणार असल्याचा विश्वास प्रहार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांचे मार्गदर्शन, ज्यात ते कार्यकर्त्यांना भविष्यातील आंदोलनात्मक आणि संघटनात्मक दिशा देतील.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी बंटी रामटेके, जितू दुधाने, वसू महाराज व गोलू पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मेळाव्याच्या तयारीसाठी अमरावतीतील सर्व पदाधिकारी कामाला लागले असून, हा मेळावा प्रहार कार्यकर्त्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
विभागीय स्तरावर होत असलेला हा मेळावा संपूर्ण विदर्भातून आलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून सामूहिक प्रेरणा व संघटनेची ताकद अधोरेखित करेल. पुरस्कार वितरण सोहळा हे या मेळाव्याचे विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे.