नागपूरमध्ये गारांसह जोरदार पाऊस

नागपूर : उन्हामुळे मागच्या काही दिवसांपासून नागपूरकर ही हैराण झाले होते. नागपूरचा उन्हाचा पारा हा 45 च्यावर गेल्याने नागपूरकरांचे बाहेर पडणे मुश्किल झाले होते. संपूर्ण अंगाची लाही लाही होत होती. मात्र नागपूर शहरातील पारडी शांतीनगर भागात आज जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. मागील दोन दिवसांपासून नागपूर शहरातील तापमानात घट झाली होती. हवामान विभागाकडून विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पाऊस झाल्याने नागपूरकरांना काहीसा गारवा अनुभवला.
सध्या देशातील बहुतांश भागात तपमानाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेल्याचे दिसत आहे. वाढत तापमान हा चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.