धारणी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर पोलिसांची कारवाई

धारणी : धारणी पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती विक्री करणाऱ्या सहा ट्रॅक्टर मालकांवर योग्य कारवाई करण्यात आली आहे. धारणी पोलिस स्टेशनच्या ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर या कारवाईला प्रारंभ करण्यात आला.
पाट्या गावातील नदीवरून दोन ट्रॅक्टर आणि वैरागड ऐथील चार ट्रॅक्टर यांद्वारे रेती चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. धारणी पोलिसांनी त्यानंतर रंगेहाथ पकडले आणि संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेतले. तसेच, धारणी तहसीलदार आणि त्यांची पथक ही माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील टोली गावातील गडगा नदीवर दोन ट्रॅक्टरांनी रेती चोरण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेले.
या कार्यवाहीत, मंडळ अधिकारी उमाळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले. ट्रॅक्टर चालकांसह त्यांना तहसील कार्यालयात आणले गेले आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली. धारणी तालुक्यातील एका महिन्यात आठ ट्रॅक्टर पकडल्याने रेती चोरांचे धाबे दणाणले आहेत.
धारणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव आणि धारणी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभूतपूर्व प्रयास केला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश, रत्नापुर, दीया, हरदोली, कढाव आणि हरीसाल गावांतील नदीत भरदीवसा रेती साठा केला जातो आणि रात्री काही तस्कर ट्रॅक्टरने या साठ्यातून रेती चोरण्याचे कृत्य करतात.
शासनाच्या मार्गदर्शनानुसार, या चोरट्यांची संपूर्ण सत्यता लवकरच उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये रेतीचा वापर कसा होतो आणि त्यावर कसे रॉयल्टी चेक केली जाईल हे पुढील तपासातून समोर येईल.