आज सोन्याच्या दरात पुन्हा बदल; महाग झालं की स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. डॉलर इंडेक्समधील घसरण, अमेरिका-चीन यांच्यातील टॅरिफमुळं अनिश्चितता आणि राजकीय तणाव यामुळं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं आज 1.5 टक्क्यांच्या मजबूतीने 96,500 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. गेल्या महिनाभरात सोनं जवळपास 10 टक्क्यापर्यंत महाग झालं आहे. त्यामुळं गुंतवणुकदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
आंतरराष्ट्र्रीय बाजारात सोन्याच्या चमक कायम आहे. कॉमेक्सवर सोन्याच्या किंमतीत आज $50ची तेजी आली असून भाव $ 3,380 च्या आसपास पोहोचला आहे. मात्र तरीदेखील सोनं ऑल टाइम हायपेक्षा $3,508 पासून जवळपास $128 च्या खाली घसरले आहे. डॉलर इंडेक्स 100च्या आसपास घसरला आहे. ज्यामुळं सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. त्या व्यतिरिक्त अमेरिका आणि चीनच्या ट्रेड वॉरबाबतही अद्याप कोणतीच स्पष्टता नसल्याने मध्य पूर्व परिसरात तणाव आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. देशांतर्गंत बाजारात चांदी 2 टक्क्यांनी उसळली असून आज प्रति किलो 96,500 वर स्थिरावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीतही मजबूती पाहायला मिळाली आहे. गेल्या एक महिन्यात चांदीच्या दरात 9 टक्क्याहून अधिक तेजी आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी $34 जवळपास ट्रेड करत आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 87,760 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 95,740 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 71,810रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,776रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,574 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,181 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 70,208 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,592 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,448 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 87,760 रुपये
24 कॅरेट- 95,740 रुपये
18 कॅरेट- 71,810रुपये