मोतीनगरमध्ये पक्षांसाठी पाणीपत्र वाटप

अमरावती : उन्हाळ्याच्या झळा जशा माणसांसाठी त्रासदायक ठरतात, तशाच त्या पशुपक्ष्यांसाठीही जीवघेण्या होतात. पिण्याच्या पाण्याची सोय अनेकदा पक्ष्यांसाठी अभावाची ठरते. शहरातील जलतळे, तलाव आटल्याने पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, काही पक्षांचे जीवही पाण्याअभावी जातात.
याच पार्श्वभूमीवर मोतीनगरमधील राजेंद्र माहुरे मित्रमंडळ आणि श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्था यांच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मोतीबाग आणि किरण नगर परिसरात पक्ष्यांसाठी पाणीपत्रांचे वाटप करण्यात आले आणि झाडांना बांधून त्यात पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. यामुळे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमात विरेंद्र गलफट, प्रविण शेंडे, उदय चव्हाण, सुनील देशमुख, बाळासाहेब ठवळी, सुनील गुल्हाणे, समीर लाडविकर, पप्पू आवारे, रामा कडू, पप्पू ठाकूर, बाळासाहेब पुरी, श्याम वानखडे, सुनील आसलकर, गुड्डू मालोकर, बाळू शेंडे, अर्णव आसलकर, राजू बांबल, बब्बल ठाकूर, मनीषा माहुरे, शारदा गोगटे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
सामाजिक भान जपत पक्षांसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायक ठरत आहे. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेऊन आपल्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन आयोजकांनी केले.