सातपुड्यातील नरनाळा अभयारण्यात जंगल सफारी बंद

सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शहानुर या गावातील पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो अनेक ठिकाणच्या लोकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनावर अवलंबून असतो मात्र हेच पर्यटन क्षेत्र वरिष्ठांच्या दुर्लक्षितपणामुळे बंद पडत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मागण्या मान्य न झाल्याने नरनाळा जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय नरनाळा वन पर्यटन असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.
गेल्या २ वर्षापासून नरनाळा संकूल पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. तर पर्यटकांच्या देखील जिप्सी चालक आणि गाइडबाबत अनेक तक्रारी असून पर्यटकांनी देखील शहानूरकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. अशातच या सर्व घडामोडीचा फटका येत्या १२ मे बौद्ध पौर्णिमला चंद्रप्रकाशात मचाणावरून होणारी प्राणी गणना (सेन्सस) मध्ये निसर्ग अनुभव घेणाऱ्या पर्यटकांना बसणार असल्याचे बोलले जात आहे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या शहानुर येथील गेटवरील गाईड आणि जिप्सी चालकांच्या विविध समस्यांचे वरिष्ठाकडून निराकरण न झाल्याने अखेर नरनाळा वन पर्यटन असोशियन तर्फे जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शुक्रवारपासून दि.२ ही जंगल सफारी बंद करण्यात आली असल्याचे नरनाळा वन पर्यटन असोशियनने कळविले आहे शहानुर पर्यटन संकुल गेल्या २ वर्षापासून बंद असल्याची याचा मोठा फटका स्थानिक पर्यटन व्यवसायाला बसत चालला आहे पर्यटकांची संख्या नरनाळाकडे रोडावत चालली होती स्थानिकांनी शहानुर गेट सफारीवर होत असलेल्या समस्या सोडविण्याबाबत वरिष्ठाकडे मागणी केली ज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर बघता जिप्सी वाहनांची भाडे वाढ करणे शहानूर गेटवरून नाईट सफारी फुल डे सफारी नरनाळा क्षेत्रातील बफरजोन क्षेत्र सुरू करणे, बफर क्षेत्रात प्रत्येक पौर्णिमेला मच्याची उभारणी करणे जिप्सी चालकांना ओळखपत्र आणि गणवेश पुरविणे गेटवर पिण्याचे पाणी आणि प्रसाधन गृहाची व्यवस्था करणे, शहानूर गेटवरील जिप्सी चे पूर्णता ऑनलाइन बुकिंग करणे आणि मागण्या स्थानिक जिप्सी चालकाकडून करण्यात आल्या होत्या मात्र त्यावर वरिष्ठांचा कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नरनाळा वन पर्यटन असोशियनने दोन मे पासून जंगल सुपारी बंद करण्याचा निर्णय घेतला,
[ पर्यटकांच्या अनेक तक्रारी ]विभागात अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली असताना शहानूर पर्यटन स्थळाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले येथील संकूल गेल्या २ वर्षांपासून बंद असून जंगल सफारीसाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची कुठलीच व्यवस्था इथे नसल्याचे पर्यटकांकडून सांगण्यात येते. शिवाय जंगल सफारीवर गेलेल्या पर्यटकांच्या अनेक ऑनलाइन तकारी जिप्सी चालक व गाइडबद्दल आहेत. योग्य प्रशिक्षण नसल्याने जिप्सी बालक जंगल फिरवत नसल्याची तक्रार आहे, इथे नियोजन व सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांची मोठी नाराजी देखील दिसून येते.