LIVE STREAM

India NewsLatest News

पाकिस्तान बिथरला! BLA च्या हल्ल्यानंतर लाहोरमध्ये साखळी स्फोट, सलग तीन स्फोटांमुळे हाहाकार

Multiple Blasts In Lahore: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक करत 9 दहशतवादी तळ उद्ध्व्स्त केली होती. भारताच्या या कारवाई जवळपास 90हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानवर आणखी एक हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर असलेले लाहोर बॉम्बस्फोटानी हादरले आहे. लाहोरमध्ये एकामागोमाग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत.

लाहोरमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झालेत. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. स्फोटांनंतर लाहोर शहरात सायरनचे आवाज ऐकायला मिळतायत. या स्फोटांच्या घटनेनंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. हा क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केलाय. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर येत आहे. मात्र या हल्ल्याने पाकिस्तानात एकच हाहाकार माजला आहे.

पाकिस्तानातील लाहोरच्या वॉल्टन, गोपाल नगर आणि नसराबाद परिसरात आज स्फोटाचे आवाज ऐकण्यात आले. घटनास्थळी बचावपथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेच. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, या परिसरात सलग तीन स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले. हे हल्ले कोणी घडवून आणले हे मात्र अद्याप कळू शकलेले नाहीये.

पाक सैन्याच्या वाहनावर हल्ला
सूत्रांनूसार, पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर बचूल आर्मीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. बोलान येथील माच कुंड या भागात हा हल्ला करण्यात असून या हल्ल्यात 12 ते 14 पाक सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएनं हा हल्ला केल्याचं यामध्ये उघड झालं. बलूच आर्मीच्या स्पेशिअल टॅक्टिकल ऑपरेश्न्स स्क्वाड (STOS) नं पाकिस्तानच्या लष्करी वाहनाला निशाणा करत रिमोट कंट्रोल आयईडी स्फोट घडवून आणला.

पाकिस्तानात घबराट
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात घबराट असल्याचे पाहायला मिळते. प्रचंड गोंधळानंतर सियालकोट शहर रिकामं करण्यात आलं आहे. तर रावळपिंडी, लाहोरमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.

पाकिस्तानात आणीबाणी
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय.. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील सर्व रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आलीय. सर्व कर्मचा-यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्यात. तसंच पाकिस्तानातील अनेक शहरात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय. मुल्तान, फैसलाबाद, इस्लामाबाद, बहावलपूरमध्येही नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आलाय..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!