Accident NewsLatest NewsRaigad
भरधाव डंपरची एसटी बसला जोरदार धडक, ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू; २० गंभीर जखमी

रायगड : रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. तळा-मांदाड रस्त्यावर अपघाताची ही घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.