नागपुरातील ‘प्रथमेश गारमेंट’ दुकान जळून खाक, १५ ते २० लाखांचे नुकसान

नागपूर : लालगंज येथील राऊत चौकात असलेल्या ‘प्रथमेश गारमेंट’ या रेडीमेड कपड्यांच्या दुकानात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत संपूर्ण रेडीमेड गारमेंट्स जळून खाक झाल्याने सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दुकानाचे मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी घरी असताना अचानक फोन आला की दुकानात आग लागली आहे. त्यावेळी माझा मुलगा दुकानातच होता. मी तातडीने घटनास्थळी पोहोचलो.”
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची तत्काळ प्रतिक्रिया:
ही घटना आज सकाळी १२:२३ वाजता घडली. आग लागल्याची माहिती मिळताच लकडगंज अग्निशमन केंद्राची गाडी तात्काळ रवाना झाली. त्यानंतर कळमना, रजीपेठ आणि सुगद नगर या फायर स्टेशनच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. चार फायर टेंडर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
अग्निशमन विभागाचा अवेअरनेस आवाहन:
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक फायर स्टेशन दर महिन्याला दोन ते तीन मॉक ड्रिल आणि जनजागृती कार्यक्रम राबवत असतो. नागरिकांनीही सतर्क राहून अशा दुर्घटनांना टाळण्याचा प्रयत्न करावा.”