पुसद शहरात पुन्हा एकदा चाकूहल्ला; तरुणाचा जागीच मृत्यू

पुसद : पुसद शहरात चाकूहल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, काल रात्री पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक दरम्यान, विद्याधन बुक डेपोसमोर एका अज्ञात व्यक्तीने एका तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला केला.
मृत व्यक्तीची ओळख सुमित पवार (निवासी नवलबाबा वार्ड, पुसद) अशी झाली असून, हल्ल्याच्या तीव्रतेमुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीमधून स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर काही वेळातच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही घटना पुसद शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आरोपींची नावे देवा श्रीरामे व पवन गावंडे अशी असून, पोलिसांकडून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पुसद शहरात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.