नागपूर हादरलं! लाकडा पुलाजवळ दुचाकीस्वाराचा थ्री व्हीलरने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू

नागपूर : नागपूर शहरात आज सकाळी एका दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लाकडा पुलाजवळ ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
एका दुचाकीस्वारास थ्री-व्हीलरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर थ्री-व्हीलर चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती आहे. अपघातानंतर काही क्षणातच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि कोतवाली पोलीस तत्काळ दाखल झाले. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस त्याचा ओळखीचा शोध घेत आहेत. तसेच हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असल्याची शक्यता असून, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. फरार झालेल्या आरोपी थ्री-व्हीलर चालकाचा शोध सुरू असून, या प्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू आहे.