मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री क्षेत्र आळंदीत सन्मान; ‘नमो ज्ञानेश्वरा’ ग्रंथाचे प्रकाशन व ऑडिओ बुकचे अनावरण

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७०० वर्षांनंतरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त, आज श्री क्षेत्र आळंदी येथे आयोजित ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव)’ या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्यावतीने मूर्ती व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो ज्ञानेश्वरा’ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच त्याच ग्रंथाच्या ऑडिओ बुकचे अनावरण करण्यात आले. हे प्रकाशन संत साहित्याच्या प्रचार-प्रसाराच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
कार्यक्रमस्थळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त, पदाधिकारी, संत भक्तगण आणि विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत “ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शिरपेचातील तेजस्वी रत्न आहे” असे सांगितले.
संत परंपरेचा गौरव करण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत ती पोहोचवण्याचा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.