अकोल्याच्या अशोक वाटिकेत बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामूहिक प्रार्थना!

अकोला : आज बुद्ध पौर्णिमा, बौद्ध अनुयायांसाठी वर्षातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस. याच शुभ तिथीला भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, आणि महानिर्वाण – ही तीन महाघटना घडल्या. त्यामुळे हा दिवस संपूर्ण जगातील बौद्ध समाजासाठी विशेष श्रद्धेचा असतो.
अशोक वाटिकेत सामूहिक प्रार्थनांचे आयोजन
या निमित्ताने अकोल्यातील अशोक वाटिका येथे सामूहिक बुद्ध वंदना व प्रार्थनांचं भव्य आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून त्रिसरण, पंचशील, बुद्धवंदना, आणि शांती प्रार्थना केली.
वातावरणात मंत्रोच्चार आणि धम्मवाणीचे पवित्र सूर घुमत होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक ऊर्जा आणि शांततेने भरून गेला होता.
बौद्ध मूल्यांचा जागर आणि समाजएकतेचा संदेश
या प्रार्थनासभेच्या माध्यमातून बुद्धांच्या अहिंसा, करुणा, आणि समतेच्या मूल्यांचा जागर करण्यात आला. उपस्थित बौद्ध बांधवांनी बुद्धांच्या धम्म मार्गावर चालण्याचा संकल्प घेतला.