आज सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा 24 कॅरेटचे दर जाणून घ्या

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. आज मात्र सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल 3 टक्के घसरण झाली होती. पण आज MCX वर सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली असून सोनं MCX वर 286 अंकानी वधारलं असून 93187 वर ट्रेड करताना दिसत आहे. तर, चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळत आहे. चांदी 1432 अंकांनी मजबूत होऊन 96776 वर ट्रेड करताना दिसत आहे.
कमोडिटी बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन आंतरराष्ट्रीय बाजारात $100ने घसरून $3250 पर्यंत घसरले आहे. तर, देशांतर्गंत बाजारात $3700ने घसरून 92.900 वर स्थिरावले आहे. तर चांदीदेखील 1400ने घसरून 95.400 रुपयांवर स्थिरावली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ दर 90 दिवस रोखण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं उद्योजकांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोन खरेदी केली आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची वाढ झाली आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 95,620 रुपयांवर स्थिरावले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दराच 130 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 71,720 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 87,650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 95,620 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 71,720 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,765 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,562 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,172रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 70,120 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 76,496 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 71,720 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-87,650 रुपये
24 कॅरेट- 95,620 रुपये
18 कॅरेट- 71,720 रुपये