सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये कर्मचारी सह अनेक समस्या

अमरावती : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अमरावती जिल्ह्याचा वैद्यकीय कणा मानलं जातं. मात्र, या हॉस्पिटलमधून आता एकामागून एक समस्या उफाळून येत आहेत.
फक्त रुग्णांच्याच नव्हे, तर स्वच्छता कर्मचारी व खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांचंही प्रचंड हाल सुरु आहे.
- वेतनासाठी आंदोलने, अखेर प्रकरण न्यायालयात
येथील अनेक खाजगी व स्वच्छता कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण वेतनाच्या समस्येला सामोरे जात आहेत. - अनेक वेळा कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागलं.
- वरिष्ठ कार्यालयात तक्रारी पोहोचवल्या.
- काहींना वेतन मिळालं, परंतु एखाद्या महिन्याचं वेतन अद्यापही थकीत.
- अखेर, कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली, आणि आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे.
स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर
रुग्णालयात दूरवरून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात, परंतु स्वच्छतेचा अभाव ही अत्यंत गंभीर बाब ठरत आहे.
कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी, बेसमेंटजवळील अस्वच्छता हे चित्र रुग्णालयाच्या प्रतिमेला मुळातून हादरवणारे.
गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या संस्थेत अशी परिस्थिती धक्कादायक ठरत आहे.
“यशस्वी शस्त्रक्रिया” आणि “यशस्वी अडचणी”?
रुग्णालयात शासकीय योजनांअंतर्गत अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा गाजावाजा केला जातो.
मात्र, मागे पडलेली व्यवस्थापनातील उणीव, कर्मचारी समस्यांचा उद्रेक, आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
या गंभीर परिस्थितीबाबत सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ डॉक्टरांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, वरिष्ठ डॉक्टर अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले, आणि उपस्थित डॉ. मेंढे यांनी बोलण्यास स्पष्ट टाळले.
लोकप्रतिनिधींना या समस्यांकडे पाहावं लागणार का?
अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध योजनांचे उद्घाटन करताना या हॉस्पिटलच्या गौरवगाथा सांगतात,
मात्र आता इथल्या समस्यांबाबत ते आवाज उठवणार का?
हा प्रश्न सध्या सर्वच नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.