भोंगेमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार, मुंबई 40% भोंगेमुक्त_किरीट सोमय्या
नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार केला असून त्याचा प्रारंभ मुंबईत झाल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबई शहर 40 टक्क्यांपर्यंत भोंगेमुक्त झाले असून उर्वरित भागातही येत्या महिन्याभरात संपूर्ण भोंगेमुक्ती करण्यात येईल.”
त्यांनी यावेळी सांगितले की, बांगलादेशी नागरिकांची चौकशी पूर्ण होताच आता राज्यभर भोंगेमुक्तीचा विषय मी स्वतः हाती घेतला आहे.
किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया ऐका
अर्धापूर बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची राज्यस्तरीय चौकशी सुरु – दोषींवर गुन्हे दाखल होणार : किरीट सोमय्या
अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आलेल्या ८२ बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी सध्या महाराष्ट्र स्तरावर चौकशी सुरु आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी नांदेडमध्ये दिली.
ते म्हणाले की, “संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. बनावट प्रमाणपत्रे कोणाच्या माध्यमातून देण्यात आली, याचा तपास सुरु असून यामधील सर्व दोषींवर गुन्हे दाखल केले जातील.”
नांदेड जिल्ह्यात अजून कुठे अशा प्रकारची प्रकरणे घडली आहेत का, याचीही चौकशी प्रशासनाकडून सुरु आहे.
- प्रकरणाचा तपशील:
- रुग्णालय: अर्धापूर ग्रामीण रुग्णालय
- प्रमाणपत्रे: एकूण ८२ बनावट जन्म प्रमाणपत्र
- चौकशी: महाराष्ट्र शासनस्तरावर सुरु
- कारवाई: दोषींवर गुन्हे दाखल होणार