वस्त्रोद्योग प्रधान सचिव अंशु सिन्हा यांची भेट

वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा यांनी आज नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क आणि बडनेरा येथील राज्य रेशीम पार्कला भेट दिली.
नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमधील कामाची पाहणी अंशु सिन्हा यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मुन, वस्त्रोद्योग आयुक्त संजय देने, वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव गणेश वंडकर, सहाय्यक आयुक्त हेमंत लाडगांवकर, तहसिलदार विजय लोखंडे उपस्थित होते.
त्यानंतर श्रीमती सिन्हा यांनी बडनेरा येथील राज्य रेशीम पार्कमध्ये तुती व टसर रेशीम शेतीची पाहणी केली. यावेळी रेशीम शेतीत नियोजित कामांबाबत सूचना दिल्या. तसेच राज्य रेशीम पार्कमध्ये टसरचे वृक्षारोपण करण्यात आले.
श्रीमती सिन्हा यांनी राज्य रेशीम पार्कमधील रिक्त पदांविषयी चर्चा केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी राज्य रेशीम पार्कमधील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.