बॉडी मसाजच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! नागपूरच्या स्पा सेंटरवर धाड
नागपूर: शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या श्रद्धानंद पेठ येथील ‘डी लाईट स्पा’ मध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 01 ला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, 13 मे रोजी दुपारी 4.15 वाजता पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एक मोठा देह व्यापार रॅकेट उघडकीस आले आहे.
फरार आरोपीसह एकास अटक
या कारवाईत रिजुल अली इस्माईल अली (वय 26, राहणार आसाम) हा मुख्य आरोपी सध्या फरार असून, रहाणउद्दीन साहाब उद्दीन (वय 26, आसाम) याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्राथमिक तपासानुसार, आरोपी क्रमांक दोनच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक एकाने पाच महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटरच्या आड देह व्यापार करण्यास प्रवृत्त केले. या महिलांचा आर्थिक फायद्यासाठी वापर करण्यात आला असून, ‘डी लाईट स्पा’ हे फक्त कवच असल्याचे उघड झाले आहे.
- 72,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त
छाप्याच्या दरम्यान, पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे: - रोख रक्कम: ₹31,700
- मोबाईल फोन्स: दोन, किंमत सुमारे ₹45,000
- कंडोम पॅकेट्स: दोन
एकूण जप्त मालमत्तेची किंमत ₹72,760 इतकी आहे. पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून, पीडित महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी बजाज नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरु आहे. देह व्यापाराच्या साखळीचा विस्तार व इतर सहभागींची माहिती मिळवण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.