यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुळतुला व गौसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न
अमरावती : अमरावतीच्या माजी पालकमंत्री आणि लोकभावनांशी जुळलेलं दमदार नेतृत्व असलेल्या श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एक आगळा-वेगळा कार्यक्रम पार पडला. गुळतुला आणि गौसेवा अशा पारंपरिक आणि अध्यात्मिक कृतीद्वारे वाढदिवस साजरा करून समाजापुढे संस्कृती आणि सेवा यांचा संगम सादर करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी खासदार बळवंतभाऊ वानखडे, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी पवार, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात गौमातेला गूळप्रसाद अर्पण, सन्मान सोहळा, व सांस्कृतिक विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना बबलु शेखावत व विलास इंगोले यांनी सांगितले की,
“हा कार्यक्रम आपल्या संस्कृतीचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एक महत्त्वाचा मंच आहे. पुढील वर्षी हा उपक्रम आणखी भव्य स्वरूपात घेण्याचा मानस आहे.”
उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते:
वसंतराव साऊरकर, संजय वाघ, आनंदबाबू भमोरे, राजीव भेले, अनिकेत ढेंगळे, सुरेश रतावा, प्रमोद इंगोले, संजय शिरभाते, राजेंद्र महल्ले, संकेत साहू, पंकज लुंगीकर, प्रदीप हिवसे, अविनाश भडांगे, किरण सौउरकर, गजानन राजगुरे, धीरज हिवसे, सुनील पडोळे, अनिल तायडे, मनीष पावडे (रोटी बँक), जयश्री वानखडे, शोभा शिंदे, रुण बनारसे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.