वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

Ratnagiri Khed Accident : रत्नागिरी जिल्ह्याती खेड येथे भीषण अपघात झाला आहे. कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. जगबुडी नदी पात्रात कार थेड कोसळून हा अपघात झाला होता. कार थेट नदीत कोसळल्यामुळं पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईनजीकच्या मिरा रोडयेथील कुटुंब देवरुख येथे जात होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच वाटेतच काळाने घाला घातला. मुंबई- गोवा महामार्गावर जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फुट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कार चालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कार जगबुडी नदीच्या पुलावरुन जात असताना भरधाव वेगात होती. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलावरुन नदीपात्रात थेट 100 ते 150 फूट खाली कोसळली. कार खाली कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला होता. क्रेनच्या सहाय्याने कार वर उचलण्यात आली. या भीषण दुर्घटनेत कार चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
मिताली विवेक मोरे
मिहार विवेक मोरे
परमेश पराडकर
मेघा परमेश पराडकर
सौरभ परमेश पराडकर
जखमींचे नावे
विवेक श्रीराम मोरे
श्रेयस राजेंद्र सावंत भाचा