महाराष्ट्राच्या राजकारणात मटका किंगची एन्ट्री! गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईल गुन्हेगाराचा मोठ्या पक्षात पक्षप्रवेश

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षात मटका किंगची एन्ट्री झाली आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईल गुन्हेगाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. या वादग्रस्त पक्ष प्रवेशाची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.
नांदेडमध्ये मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनवर अली खान यांचा आमदार प्रताप पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. या प्रवेशानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याची जोरदार टीका शिवसेना उद्ध ठाकरे पक्षाने कली आहे. अनवर अली खान वर मटक्याचे अनेक गुन्हे, प्राणघातक हल्ला करणे, अवैध्य पिस्तूल बाळगने, अवैध्य पिस्तूल मधून गोळीबार करणे, दरोडा, हाणामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पक्षात प्रवेश देताना तो कार्यकर्ता चारित्र्यसंपन्न असला पाहिजे हे बघा, दोन नंबरचा धंदेवाला असेल तर टायरमध्ये गेलाच समाजा असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. पण नांदेडमध्ये मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनवर अली खान याला काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. आमदार प्रताप पाटील यांच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश झाला. अनवर अली खान वर मटक्याचे अनेक गुन्हे, प्राणघातक हल्ला करणे, अवैध्य पिस्तूल बाळगने, अवैध्य पिस्तूल मधून गोळीबार करणे, दरोडा, हाणामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा परळीत आली. उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या विकास आराखडा बैठकीसाठी अजित पवार परळीत आले होते. यावेळी वैद्यनाथ परिसरातील मंदिराच्या पायऱ्या चढत असताना अजित पवारांची नजर पायऱ्याच्या निकृष्ट कामावर गेली. त्यावेळी अजित पवार ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. असे काम चालणार नाही अशी तंबी देत, काम सुधारा अन्यथा खडक कारवाई करेन असा इशारा अजित पवार यांनी संबंधित ठेकेदाराला दिला.