Amaravti GraminLatest News
परतवाडा पोलीस स्टेशनच्या वतीने फौजी आशिष सिंग बावरी यांचा सन्मान

परतवाडा – देशाच्या सीमारेषेवर कार्यरत असलेले व मिशन सिंदूर मध्ये सक्रिय सहभाग असलेले परतवाड्याचे सुपुत्र फौजी आशिष सिंग बावरी यांचा परतवाडा पोलीस स्टेशन च्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
या विशेष सत्कार समारंभात परतवाडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कुलदीप सिंग, रोहित सिंग बावरी, राहुल वानखडे यांचीही उपस्थिती लाभली होती.
परतवाड्यातील या युवा जवानाने देशसेवेत केलेले योगदान ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेला सन्मान हा केवळ आशिष सिंग यांच्यासाठी नव्हे, तर देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सर्व जवानांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
🔹 मिशन सिंदूर या संवेदनशील मोहिमेमध्ये आशिष सिंग यांनी दाखवलेले शौर्य आणि निष्ठा यामुळे त्यांचा सत्कार करताना परिसरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.