शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांना सीमाडोह आंदोलनात मिळाले यश
23 सप्टेंबर 2024 रोजी सीमाडोह धारणी परतवाडा अमरावती मार्गावर झालेल्या अपघातामध्ये जे निष्पाप चार बळी गेले व 16 लोकांना अपंगत्व आले अशा लोकांना न्याय देण्याकरिता प्रवीण हरमकर यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या पाच जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला दोन तास कोंडून या प्रकरणाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आंदोलनामुळे मिळालेल्या प्रयत्नांचे यश म्हणजे या ठिकाणी जाऊन केलेल्या पाहणीवरून या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग चे तसेच सुरक्षा भिंतीचे देखील काम सुरू झालेले आहे काही ठिकाणी रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले आहे अशा प्रकारे बांधकाम विभागाला काही प्रमाणात जाग आलेली आहे परंतु बीएडसीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा ठेकेदारांचा इंजिनीयरचा निष्काळजीपणा व कामातील निष्क्रियता यामुळे झालेल्या या भीषण अपघातात अद्यापही त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही झालेली नाही जर या प्रकरणात यांच्यावर कार्यवाही करण्यात दिरंगाई झाली तर शिवसेना आपल्या पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलन करून मग ते कुठल्याही लेव्हलचे असो या प्रकरणाला न्याय देईल.