Latest NewsLocal News
निरोगी जीवन जगण्याची कला म्हणजे योग – डॉ. श्रीकांत पाटील
योग मुळात मानवी जीवनासाठी एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारीत आहे. आध्यात्मिक शिस्त मानवी मन आणि शरीर यांच्यातील सुसंवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करते. शरीरिक आणि मानसिक व्याधींवर योगासने व प्राणयाम म्हणजे हुकमी उपचार ठरतात. औषधीविना शरीर आणि मन सुदृढ ठेवण्याचे काम योगा आणि प्राणायाम करतो, त्यामुळे निरोगी जीवन जगण्याची एक उपयुक्त कला म्हणजे योग असून ती सर्वांनी आत्मसात करावी, असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यातिथी निमित्त गुरूकुंज मोझरी येथे आयोजित योगाभ्यास व प्राणायाम वर्गातील कार्यक्रमात बोलत होते.
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या प्रेरणेने व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गुरूदेव आश्रम गुरूकुंज मोझरी येथे 16 ते 22 ऑक्टोबरदरम्यान सर्वांसाठी दररोज सकाळी 2 तास योगाभ्यास, योग प्रात्याक्षिक, आहार या विषयावर आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. विभागातंर्गत एम.ए. योगशास्त्र, पी.जी. डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अॅन्ड योगिक सायन्स आणि पी.जी. डिप्लोमा इन योगा थेरपी या तीन अभ्यासक्रमांच्या शिक्षकांकडून रोज योगभ्यास सत्र व स्वास्थविषयक विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच प्रात्याक्षिक सादरीकरण करुन उपस्थितांना आरोग्य विषयी धडे देण्यात आले. या सात दिवसीय कार्यक्रमात योग बरोबरच आहार व स्वास्थ्य यावर डॉ. अश्विनी राऊत यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तर प्रा. पूजा म्हस्के यांनी भगवद्गीतेतील योग, मानवी जीवन आणि आहार इत्यांदिचे महत्व पटवून दिले.
डॉ. अनघा देशमुख यांनी सजीवाच्या अस्तित्वासाठी श्वसनक्रिया किती आवश्यक आहे, श्वसन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्राणायम म्हणजे श्वसनाचे नियमन होय, प्राणायमाच्या नियमित अभ्यासाने मानवी शरीराचे शारीरिक, मानसिक व भावनिक अडथळे दूर करत श्वास मोकळा करून शरीराला सकारात्मक उर्जा प्राप्त होते असे; सांगून प्राणायाम, श्वास व मानवी शरीर यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रा. राधिका खडके, प्रा. शिल्पा देव्हारे, प्रा. स्वप्निल ईखार, प्रा. भूषण परळीकर इत्यादी योगशिक्षकांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. प्रा. आदित्य पुंड, प्रा. स्वप्निल मोरे, प्रा. प्रफुल्ल गांजरे, प्रा. राहुल दोडके यांनी उपस्थितांचा योगाभ्यास करुन घेतला. शिक्षकांनी नि:शुल्क सातही दिवस योगाभ्यास, प्राणायाम यासह आहाराविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सेवक, विद्यार्थी, भाविक भक्त आदी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे माजी विद्यार्थी तसेच श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य श्री अक्षय धानोकर यांचे विशेष सहकार्य लाभले.