अमरावती विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांचे नामांकन दाखल
अभूतपूर्व नामांकन रॅलीत महायुतीच्या समर्थकांची अफाट गर्दी
अमरावती विधानसभा मतदार संघात वाढली घड्याळाची टिकटिक..
अमरावती २९ ऑक्टोबर :- एकच वादा,अजितदादा,.. वारे घड्याळ,आला रे घड्याळ.. , सुलभाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…महायुतीचा विजय असो, अशा गगनभेदी गर्जनांनी आज आसमंत दणाणून गेला. अमरावतीमधील हजारो समर्थक या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार सुद्धा ठरले. हे चित्र आहे. अमरावती विधानसभा मतदार संघ निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.सुलभाताई संजय खोडके यांच्या भव्य नामांकन रॅलीचे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होऊ घातले आहे. या निवडणुकीत अमरावती विधानसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती तहसील कार्यालय येथे नामांकन दाखल केले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अधिकृत ए-बी फार्म त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांना सादर केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आ. प्रवीण पोटे पाटील, माजी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संतोष बद्रे, माजी उपमहापौर कुसुम साहू, माजी नगर सेवक भूषण बनसोड, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी श्रीमती लता विजय हाडोळे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी ११ वाजता संत गाडगेबाबा समाधी मंदिर गाडगे नगर येथून भव्य नामांकन रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ,भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी , स्थानिक प्रमुख नेते , कार्यकर्ते व सर्व सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महायुतीमध्ये सहभागी घटक पक्षाच्या झेंडे, दुपट्टे व पोस्टर यांचा मिलापात महायुती समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नामांकन रॅलीच्या अग्रभागी असलेल्या महायुती उमेदवार आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी तमाम अमरावतीकर जनतेला अभिवादन करून आपला साथ , विश्वास व आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्यावा, व निवडणुकीत पाठबळ व समर्थन देण्याचे आवाहन केले. दरम्यान सुलभाताईंनी शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. अमरावती विधासभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांना निवडणूक आणण्याचा निर्धार करीत महायुतीच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. स्थानिक सांस्कृतिक भवन परिसरातही सौ. सुलभाताई संजय खोडके समर्थकांच्या एकजुटीचे दर्शन घडून आले. जिकडे तिकडे घड्याळाचे वारे वाहू लागल्याने याची टिकटिक सर्वत्र जोर धरू लागली होती. महायुतीच्या उमेदवार सौ. सुलभाताई खोडके यांच्या नामांकनाच्या वेळी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
अमरावतीच्या विकासाला नवी दिशा व गती देण्यासाठी माझी उमेदवारी- आ.सौ. सुलभाताई खोडके
गेल्या पाच वर्षांपासून अमरावती शहरामध्ये विकासाचे पर्व नांदत असून आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर अमरावती विधानसभा निवडुकीला सामोरे जात आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जे निर्णय घेतले त्याचा अमरावतीला पुरेपूर लाभ झाला. महायुती ने आपल्यावर विश्वास दर्शवित उमेदवारी दिली आहे. महायुती सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आपला मानस आहे. या निवडणुकीत सर्व घटक पक्षाची साथ मिळाली असल्याने आपली बाजू भक्कम झाली आहे. निवडणुकीला कमी दिवस उरले असून प्रचारा साठी जनआशीर्वाद यात्रा आरंभिली आहे.या सुद्धा नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.
विधानसभेची निवडणूक ही गतिशील,प्रगत व विकसित महाराष्ट्र घडविणारी असून जनतेच्या उज्वल भविष्याला दिशा देणारी आहे. त्यामुळे तमाम जनतेने महायुतीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून घड्याळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.