भीमटेकडीवर रमाईला दिली मानवंदना, ५ हजार भीमसैनिकांचा साक्षात्कार

अमरावती : महापरिनिर्वाण दिनाच्या धर्तीवर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनसाथी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनी २७ मे रोजी भीमटेकडी, अमरावती येथे एक ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ५ हजार भीमसैनिक सहभागी होणार असून, सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल महाराज यांच्या सादरीकरणात प्रबोधनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
“बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी अभिवादन करतात, त्याच श्रद्धेने रमाई आईंनाही मानवंदना मिळायला हवी,” असं मत मुख्य आयोजक राजसाहेब वाटाणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
या पत्रकार परिषदेला विनोद गुळदेवकर, व्ही. एम. वानखडे, प्रा. काशिनाथ बनसोड, विजय गायकवाड, अनिल खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांनी हे देखील सांगितले की हा कार्यक्रम एक सामाजिक प्रबोधन चळवळीचा भाग आहे.
प्रबोधन, श्रद्धा आणि संघटनशील एकत्रीकरणाचा नवा अध्याय!
रमाई आईंचा परिनिर्वाण दिन केवळ स्मरणरूपी कार्यक्रम न राहता, तो संविधान, समता आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा उत्सव ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
मुख्य आयोजक राजसाहेब वाटाणे म्हणाले:
“रमाई आई म्हणजे बाबासाहेबांच्या संघर्षाची सावली. त्यांच्या त्यागाला मान देणं, हीच खरी अभिवादनाची भाषा आहे.”