LIVE STREAM

AkolaLatest News

खरीप हंगाम तोंडावर, अकोल्यात तूर विक्रीला वेग

अकोला : खरीप हंगाम तोंडावर येत असताना, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी परेण्यांच्या तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आता मागील हंगामातील तुरीच्या शिल्लक मालाची विक्री करताना दिसत आहेत.

मागील आठवड्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची एकूण १,२७६ क्विंटल आवक झाली होती. या काळात शेतकऱ्यांना तुरीचा सरासरी दर प्रतिक्विंटल ६,९०० रुपये, तर जास्तीत जास्त ७,१७५ रुपये इतका मिळाला.

आज सोमवारपासून बाजार पुन्हा सुरू होत असून, तुरीच्या दरात वाढ होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागणीचा ओघ कायम राहिल्यास दरात थोडीशी वाढ होण्याची शक्यता बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी बाजारभाव आणि हवामानाचा विचार करून साठवलेली तूर योग्य वेळी विक्रीस काढावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

प्रतिनिधी – मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!