डॉ. अशोकजी उमप यांची महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशन अमरावती जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
अमरावती : साईनगर परिसरातील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. अशोक उमप यांची महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशन अमरावती जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, या यशाबद्दल संपूर्ण साईनगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. उमप यांचा अमोल इंगळे मित्र मंडळ तसेच साईनगरवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
डॉ. अशोक उमप हे गेली अनेक वर्षे साईनगर परिसरात निस्वार्थ भावनेने वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या शांत, सेवाभावी व समाजाभिमुख स्वभावामुळे ते परिसरातील लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. केवळ वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे.
डॉ. उमप यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत रुग्णांना तत्पर सेवा पुरवली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशनने त्यांना अमरावती जिल्ह्याचे अध्यक्षपद बहाल केले आहे.
या नियुक्तीच्या निमित्ताने साईनगर परिसरातील विविध मान्यवरांनी डॉ. उमप यांचा सत्कार केला. यामध्ये अमोल इंगळे, सचिन भेंडे, गजेंद्र बोंडे, अॅड. आशिष लांडे, दिनेश ठाकरे, संतोष कुरेकर, संतोष वाके, नितीन भेंडे, नितीन ठाकरे, वैभव राऊत, किरण गावंडे, प्रमोद ठाकरे, वानखडे सर, मिश्रा साहेब, सारंग नागठाणे, भडके साहेब, सूर्यप्रकाश माहोरे, विठ्ठलराव शेळके आणि राजेंद्र धोटे यांचा सहभाग होता.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी डॉ. उमप यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.