LIVE STREAM

gold rateLatest News

आज सोन्याच्या दरात किती वाढ? वाचा आजचे 24 कॅरेटचा भाव

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळं सोनं आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर सोनं 103 रुपयांनी महाग झालं असून 95246 वर ट्रेड करत आहे. तर, एकीकडे चांदीची चमकदेखील वाढली आहे. चांदी प्रति किलो 545 रुपयांनी महागली असून 98020 वर व्यवहार करत आहे. याचा परिणाम देशांतर्गंत बाजारावरदेखील होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र भारतात सोन्याचे दर घसरले आहेत.

कमोडिटी बाजारातही सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. तर एकीकडे कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळं किंमती 1 टक्क्यांनी 64 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. सोन्याच्या दरातगी घट आली आहे. टॅरिफ टेन्शन कमी झाल्याने सोनं 40 डॉलरने घसरून 3,350 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. चांदीच्या दरातही थोडीशी घसरण झाली आहे. त्याचबरोबर 33.5 डॉलरच्या आसपास चांदी स्थिरावली आहे. देशांतर्गंत बाजारातदेखील सोनं 800 रुपयांनी घसरून 95,100 आणि चांदी 600 रुपयांनी घसरून 97,500 रुपयांवर स्थिरावली आहे.

आज बुधवारी 28 मे 2025 रोजी सोन्याचे दर 660 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 97,600 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 89,300 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळं येणाऱ्या काहि दिवसांत सोन्याचे दर 94,500 ते 96,750 रुपयांमध्ये व्यवहार करू शकतात. अशातच सोन्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोनं 89,350 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 97,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 660 रुपयांपर्यंत घट झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!