LIVE STREAM

Latest Newsmelghat

धारणी शहरात एकाच रात्री तीन घरफोड्या; लाखोंचा ऐवज चोरीला

धारणी : धारणी शहरात सोमवारी रात्री चोरीच्या तीन सलग घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एकाच कॉलनीतील समोरासमोरील तीन बंद घरे चोरट्यांनी निशाणा बनवले. चोरट्यांनी कुंडी व लॉक कटरच्या साहाय्याने घरात प्रवेश करत लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश पंड्या (हॉटेल व्यवसायिक) यांच्या घरातून ₹5,000 रोख, चांदीचे दागिने व नाणी चोरीस गेली. दुसरीकडे, ज्ञानेश्वर कातखडे यांच्या घरात चोरट्यांनी संपूर्ण सामान अस्ताव्यस्त केले, मात्र चोरीसाठी काहीही सापडले नाही. तिसऱ्या घरात, गजेन्द्र हाडोळे यांच्या घरातून ₹30,000 रोख रक्कम व अंदाजे चार ते पाच तोळे सोनं चोरीला गेल्याची माहिती त्यांच्या मित्र मुंडे सरांनी दिली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
धारणी शहरासह तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाईक चोरी, पाकीटमार, बाजारात मोबाईल चोरी यांसारख्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं व असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनांनंतर धारणी पोलिसांवरील दबाव वाढला आहे. स्थानिकांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. विशेषतः बंद घरे व नजरेआड भागांमध्ये लक्ष ठेवण्याची गरज असून, धारणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!