AmravatiLatest NewsLocal News
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, ननसा संचालक डॉ. अजय लाड तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारीे उपस्थित होते. संचालन व महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली