LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

अमरावती – शौर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रतापसिंह यांची जयंती अमरावती महानगरपालिकेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, मालमत्ता अधिकारी दीपक खडेकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. प्रियश्री देशमुख, जितेंद्र पुरते, प्रशांत मेहरे, प्रमोद मोहोड, भूषण खडेकार, सिमंत गजभिये, शिवा फुटाणे, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती अभिमानाने साजरी केली जाते. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आजही प्रशासन आणि नागरिकांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करत असते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!